प्रेम
प्रेम
तू नजरेत वाचावं माझं प्रेम
आणि मी तुला लिहीत जावं
त्याच प्रेमाने आयुष्यभर मनावरती
तू शोधावं माझं अस्तित्व तुझ्या हृदयात
आणि मी तितकीच खोल लपावी
काळजात तुझ्या
तू हरवून जावं स्वतःला
आणि मी तुझ्यात शोधावं मला
दोघे एकत्र प्रवासी होऊन
मी तुझं प्रतिबिंब व्हावं
तुला न्याहळताना मी विसराव मला
आणि तू माझं न विसरणार
मनाच्या आतील गुपित व्हावं
ओळींना ओळ जोडत नाही मी
तुझं प्रेम मला ओढत नेत शब्दांबरोबर
तुझ्यात भावना गुंतत जातात
आणि मी तुझी कविता होऊन जाते
ही कविता कायम तू गुणगुणत रहावी
तितकीच मी तुझ्यात राहीन
कायम स्थिर होण्यासाठी
तू हक्क व्हावास माझा
आणि मी त्याच हक्काने कायम मिरवाव
माझ्या नावामागे तुझं नाव याव
तू माझं आयुष्याच कुंपण व्हावं
मी त्यात कायम अडकाव
मरेपर्यंत सुरक्षित जगण्यासाठी

