STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

3  

Gajanan Pote

Inspirational

आनंदाने जगावे

आनंदाने जगावे

1 min
246

मतभेद असावे मनभेद नसावे

रुसणे असावे रुतणे नसावे।।

पाठीवरती हात कौतुकाचा असावा 

तो स्पर्श आपलेपणाचा हवा।। 

मोठ्यांच्या ओठी काळजीचे बोल असावे

उगीच अपशब्दांचे तीर नसावे।। 

मनी एकमेकांविषयी प्रेम असावे 

द्वेष भावनेला दुर सारावे।। 

बोलताना शब्द जपून बोलावे

उगीच कोणावर त्याचे वार न करावे।। 

जीवन हे सुंदर आहे ते आनंदाने जगावे

उगीच दुसऱ्यांच्या आनंदात विरझन न टाकावे।। 

मनमोकळ्या मनाने हसावे हसवावे 

मात्र बोलण्याने कोणाचे मन न दुखवावे।। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational