STORYMIRROR

Gajanan Pote

Others

3  

Gajanan Pote

Others

माझी शाळा

माझी शाळा

1 min
145

सुंदर, छान, रम्य असे

जणू मनोहर ती बाग असे

ज्ञानाचा प्रकाश चहूकडे

ज्ञान मंदिर असे ते आमचे 

माझी शाळा माझा अभिमान असे

भेदभाव तिथे न दिसे 

विद्यार्थी तेथील फुलपाखरे 

माझ्यासाठी तिच काशीधाम असे

संस्काराचा पाठ तिथेच मिळे 

विद्यावान विद्यार्थी इथेच घडे

नवप्रगतीचे शिकवतो आम्ही धडे 

माझी शाळा मज अतिप्रिय असे 

मन, शरिर सुदृढ करण्याचा 

विद्याविभूषित विद्यार्थी घडवण्याचा 

संकल्प आमचा नित्य असे 

माझी शाळा माझे देवालय असे


Rate this content
Log in