आली दिवाळी
आली दिवाळी
अनारस्याचा गोडवा
सोबत खुसखुशीत चखली
करंजीचा स्वभाव हळवा
चिवड्याने चव वाढवली ||
आली बघा दिवाळी
आनंदाचे क्षण घेऊन
घेऊन फराळाची थाळी
झाले सारे घर रंगवून ||
दिव्यांचा प्रकाश अंगणात
नव्या कपड्यांचा मनात सुवास
आकाश कंदिल जणु तो दिसे गगनात
लक्ष्मी यावी घरात हिच मनी आस ||
आली दिवाळी घेऊन धम्माल
फटाके फोडण्यास सारे तयार
आनंदात असती सारे बालगोपाल
येता दिवाळी मनी दाटे हर्ष फार||