STORYMIRROR

Gajanan Pote

Classics Fantasy

4  

Gajanan Pote

Classics Fantasy

मनाचा अथांग पसारा

मनाचा अथांग पसारा

1 min
1


मन उडणारं पाखरू,
मन निरागस लेकरू...
मनात चिंतेचा बाजार,
मनात विचार हजार! ॥ १ ॥

मन उनाड वारा,
मनात भावनांचा पसारा...
मनात प्रेमाचा अंकुर,
मन होई कधी क्रूर! ॥ २ ॥

मन शीतल चंदन,
मनाला नसे बंधन...
मन खोल डोह,
मनाला असे मोह! ॥ ३ ॥

मनाचा नसे ठाव,
मन आठवणींचा गाव...
मन वाहता झरा,
मनाचा शोधावा किनारा! ॥ ४ ॥

— गजानन दशरथ पोटे, 
अकोला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics