वारे वारीचे
वारे वारीचे
वारे वाहती वारीचे,
पांडुरंगाच्या भक्तीचे...
टाळ-मृदंगाचा स्वर,
पसरला असे सर्वदूर! ॥ १ ॥
विठ्ठल नामात होऊन दंग,
गातो आम्ही तुकोबांचे अभंग...
येता विठ्ठल नामाची लहर,
जीवनाला येईल बहार! ॥ २ ॥
सोहळा रंगला पंढरपुरात,
आसमंत दुमदुमला विठूमाऊलीच्या गजरात! ॥ ३ ॥
— गजानन दशरथ पोटे, अकोला
