भारत माझा
भारत माझा
वीरांची ही धरणी माता
अगाध आहे हिची गाथा
विश्वात महान ही भूमी
सदैव वंदन करु तिला आम्ही
विविधतेने नटलेला हा देश
एक आम्ही सारे जरी वेगळा वेश
एकतेचा संदेश जगात दिला
अहिंसेचा मंत्र या देशाने सांगीतला
राम कृष्णाची ही पवित्र धरणी
गंगेचे वाहते पवित्र पाणी
जगात सुंदर माझा भारत
भारतीय आम्ही हीच आमची जात
