||आई||
||आई||
आई माझी सुखसागर
आई माझी माझा आधार ||
आई माझी मायेची सावली
आई माझी गुरु पहिली ||
आई वात्सल्याची खाण
आईने दिले मज जीवन ||
आईच्या ह्रदयात प्रेमाचा झरा
जशी गाय लावी जीव वासरा ||
आई माझी आहे माझे दैवत
तिचा आहे आम्हावर वरदहस्त ||
आई माझी असे उभी पाठिशी
तिच्या चरणात दिसे मज काशी ||
दुःख तिचे ठेवी ती लपवून
आम्हासाठी घालते सुखाचे लिंपण ||
प्रत्येक आई आहे जगी थोर
आहे ती आपल्या आयुष्याचा सार ||
