श्रावण भक्ती
श्रावण भक्ती
महिना हा पाऊस सरींचा
श्रावण मास शिव भक्तीचा
सोमवार दिन मानाचा
होत असे गजर महादेवाचा
व्रत वैकल्ये करती श्रावण सरी
नागपंचमीला नागपुजन होई
बहीण बांधे रक्षेचे बंधन बंधूच्या करी
श्रावणात कोकिळ चोरून गीत गाई
श्रावण भक्तिभावाचा मास
आनंदाने सजते सृष्टी मनोहर
मनोकामना होईल पूर्ण हीच असे मनी आस
जलाभिषेक करे निसर्ग महादेवावर
