STORYMIRROR

Gajanan Pote

Inspirational

3.4  

Gajanan Pote

Inspirational

नारी

नारी

1 min
63

जन्म तुझा गं अनमोल नारी 

तुच आहेस गं तुझी तारणहारी ||

समजू नकोस स्वतःला तू अबला 

हाती घेऊन शस्त्र हो तू सबला|| 

तुझ्यात आहे बघ शक्ती न्यारी 

दुर्गे आहे ग तुझी सिंहाची सवारी ||

तू उचलला संसाराचा ग भार 

तुच आहेस शिवरायांची ग तलवार ||

नको समजू ग स्वतःला लाचार 

तू आठव जरा राणी लक्ष्मीबाईंची ललकार ||

नको जगूस लाजून, घाबरून ग

लढ जगाशी होऊन वाघिण ग ||

सोड आता वाचने पोथी पुराण 

आहे तुझ्या हक्काचे ते संविधान ||

समजून घे ग तू शिवरायांचे चरित्र 

मग बघ कसा घडेल तुझा गं वीर पुत्र ||

नाही येथे तुला वाचवणारा कोणी राम कृष्ण 

होऊन काली,चंडी तुच कर स्वतःचे रक्षण ||


गजानन दशरथ पोटे 

अकोला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational