रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस
रिमझिम बरसणारा हा पाऊस
आठवणी घेऊन येतो हा पाऊस
चिंब चिंब मन भिजवून जातो हा पाऊस
रिमझिम रिमझिम बरसत
अलगद ह्रदयात बसतो हा पाऊस
कधी हवा हवासा, कधी नकोसा
वाटतो हा पाऊस
दुःख, आनंद देऊन जातो हा पाऊस
झोपडीतून वेगळा आणि मोठ्या बंगल्यातून वेगळाच दिसतो हा पाऊस
कोणाला रोमॅन्टिक तर कोणाला जीवघेणा वाटतो हा पाऊस
पाऊस तोच रिमझिम बरसणारा
प्रत्येकाला हवा तसा वाटणारा....