श्रावण सरी!!
श्रावण सरी!!
येता श्रावणाच्या सरी
हर्ष दाटला मनी
सृष्टी ही सारी श्रृंगार करी
चाफा,मोगरा गाई आनंद गाणी||
आला श्रावण भक्तिभाव घेऊन
सरीत भिजून पवित्र दिसे ही धरा
मन होई प्रसन्न रम्य पहाट पाहून ||
श्रावणसरीत मन भिजते चिंब
फुलतो अंगणीचा मोगरा
हसतो तो अबोल चाफा
काट्यातही खुले गुलाब हसरा||
श्रावण सरीत आज धरणी न्हालेली
नवचैतन्य सर ही घेऊन आली
नदी आनंदात वाहू लागली
जगण्याची तिने उमेद दिली ||