.......कविता तू
.......कविता तू
गाऊन दाखव तू सप्त सुरांच्या भेटी
वरुण बनुनी सोबत आपण दोघी धाऊ
बासुरी वरती वसलेले ते सारे सुर
का अनोळखी वाटतात ते कुणास ठावूक
आनंदाच्या क्षणांनी भरून दिलं ए तू
ते आंगण आमच्या हृदयातल
हास्य आमचं आणि कारण तू
चार भिंतीत दिसलेलं इंद्रधनुष्य आमच्या नभातल
एक वाट आणि साथ तू
दुसरी वाट आणि मात तू
पक्षी आणि झाडांची शर्यत मधे तुला पळावस वाटत
रात्री चमकणाऱ्या आकाशाकडे टक लाऊन
बघत असताना सूर्या वर मात केलेलं तुला भासत
दिवस अपूर्ण वाटतो जोपर्यंत
शेवटच्या प्रहराला तू किनाऱ्याला नाही भेटत
भेटीगाठी कराव्या छोटंसं भांडण एक दोन गाणी
तोपर्यंत सागरात सूर्य किरणांच प्रतिबिंब नाही शोभत
इतका वेळ पण नाही झाला
तुझ्या नावातला गोडवा जाणून
तरी आपुलकीच्या घरात तुझा सहवास हवा हवासा वाटतो
कितीच फरक पडतो त्या घरात फक्त तुझ्या आठवणी साठून
वर्ष उलटतील मैत्री बदलतील विसरू नको मात्र तू
खूप सगळ्या गोष्टींची ओळख मला करून दिलेली तू
मी जाणार कुणी दुसर येणार असे सर्व क्षण सावर तू
शब्द कमी पडतील अशी सतत मला बनवायला लावणारी
ती एक कविता तू.

