STORYMIRROR

AS 14

Others

3  

AS 14

Others

आज...

आज...

2 mins
187

आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, देवाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज एकाच शरीरात दोन आयुष्य जगवायची तिची शर्यत सुरु झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, जगाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज नऊ महिने मला गर्भात ठेवल्याची गोड फळे तिला मिळायाला सुरुवात झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, डॉक्टरांची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज मला पहिल्यांदा डोळे भरून पाहण्याची इच्छा तिची पुर्ण झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली,निसर्गाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज मला रांगताना बघून हलकीशी पण तिची पापणी ओली झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, जीवनसत्वाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज माझ्या उंदीरमामासारख्या आलेल्या दातांना बघून तिची छोटीशी खळी एका स्मित हस्यात रूपांतरित झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, शिक्षिकेची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज माझ्या हस्ताक्षरातील तिचे, लिहलेले नाव बघून झालेला आनंद गगनात मावणार नाही याची तिला जाणीव झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली,काळाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज मला बाहुली सारखं तयार करून दृष्ट काढण्याची घाई तिला अनावर झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरुवात झाली,वाढत्या वयाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज बाहेरच खाऊ नको अस सांगत असणारी चल पीझ्झा खाऊ अस सांगत मी पण मॉडर्न आहे अशा फुशारक्या मारत मला खर पटून देण्याची तिला घाई झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, कडकं अशा शिस्तेची माझ्यावर हि कृपाच झाली,

कारण आज एवढ्या मेहनती नंतर बनवलेल्या गोल चपाती ने तिची मान गर्वाने उंच झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, पळणाऱ्या घड्याळाची माझ्यावर हि कृपाच झाली,

कारण आज माझ्या लहानपणीच्या फ्रॉक मधून काठ पदराच्या साडीतल रुप बघून स्वतःचं प्रतिबिंबच बघितले अशी तिची समजूत झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली,आई ह्या व्यक्तिमत्वाची माझ्यावर ही कृपाच झाली,

कारण आज मी चालायला लागल्यापासून ते आयुष्याची शर्यत जिंके पर्यंतच्या सगळ्या आठ्वणी ती माझ्या हातात सोपाऊन तिच्या कर्तव्यातून मुक्त झाली;


आज माझ्या आयुष्याची सुरूवात झाली, तंत्रज्ञानाची सगळ्यांवरच ही कृपा झाली,

कारण आज मी लिहलेली ही कविता वाचून फक्तं घरकाम करणारी आई सुद्धा सगळ्यांसाठीच देवा एवढी श्रेष्ठ झाली.


Rate this content
Log in