STORYMIRROR

AS 14

Inspirational

4  

AS 14

Inspirational

ती कमी..

ती कमी..

1 min
230

जन्मापासूनच आपल्याला गरज असते एका आधाराची,

ती कमी पूर्ण करत असते एक माया आपल्या आईची;

पहिलं पाऊल ठेवत असताना गरज असते एका बोटाची,

ती कमी पूर्ण करत असते एक साऊली आपल्या बापाची;

बालवाडीत अक्षर गिरवताना गरज असते एका शिस्तेची,

ती कमी पूर्ण करत असते एक काळी छडी आपल्या शिक्षिकेची;

शर्यतीत धैर्याने पळण्यासाठी गरज असते एका ललकारीची,

ती कमी पूर्ण करत असते एक लाल शिट्टी आपल्या कडक सरांची;

पाठांतर देताना न अडखळल्या वर गरज असते एका बक्षीसाची,

ती कमी पूर्ण करत असते एक छोटीशी खळी आपल्या प्रिय शिक्षकाची;

गृहपाठ तपासून झाल्यावर गरज असते एका शिक्क्याची,

ती कमी पूर्ण करत असते एक महत्वपूर्ण सही आपल्या मुख्याध्यापकांची;

शाळा सुटल्यानंतर घरी जाताना गरज असते एका निरोपाची,

ती कमी पूर्ण करत असते एक नजर आपल्याला कधीही न थांबविनाऱ्या शिक्षकांची;

अडचणींमध्ये फसल्यावर आपल्या खांद्याला गरज असते एका खांद्याची,

ती कमी पूर्ण करत असते एक आपुलकी आपल्या मित्रस्वरूप शिक्षकाची;

यशाची पायरी गाठल्यावर गरज असते एका मऊदार ऊबेची,

ती कमी पूर्ण करत असते एक गळाभेट आपल्या बापासारख्या शिक्षकाची;

गेलेल्या दिवसांना छान स्वरूप देण्यासाठी गरज असते एका आठवणीची,

ती कमी पूर्ण करत असते एक ओली पापणी आपल्या आयुष्याच्या शिल्पकराची;

प्रत्येक व्यक्तीला आयुष्याचा धडा देण्यासाठी गरज असते एका शिकवणीची,

ती कमी पूर्ण करत असते ही एक गोष्ट शिष्य आणि शिक्षकाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational