STORYMIRROR

AS 14

Others

3  

AS 14

Others

त्या मनाला ला..

त्या मनाला ला..

1 min
180

लहानपणी एका चॉकलेट वर खुश होऊन जाणार मन आज काजुकतलीला सुद्धा नाही म्हणायला लागलंए ,

का जाणे पण भरलेल्या खोलीत सुद्धा एकट असल्याची खूण दाखवायला लागलंए ,

म्हणजे आता त्या मनाला नकळत खऱ्या प्रेमाची भूक लागायला लागलीए;

अंगाईगीत ऐकून शांत झोपून जाणार ते मन आज प्रेमाचे गीत ऐकून अपुरी झोपेवर सुद्धा खुश राहायला लागलंए ,

का जाणे पण त्या गीतांचे बोल ऐकत डोळ्यांतल अश्रू सुद्धा त्या इवलुष्या खळीत जाऊन लपायला लागलंए ,

म्हणजे आता त्या मनाला खऱ्या प्रेमाचे गीत ऐकायची चाहूल लागायला लागलीए;

पुस्तकांमध्ये रमून जाणार ते मन आज आभाळाकडे एकटक नजर लावून कवितांचे बोल जुळवायला लागलंए ,

का जाणे पण संपणाऱ्या प्रत्येक ओळीवर हृदयाच्या चिन्हाला स्थान द्यायला लागलंए ,

म्हणजे आता त्या मनाला खऱ्या प्रेमाचे धडे शिकायची ओढ लागायला लागलीए;

आयुष्यात कधी ही कोणाची वाट न पाहणार हे मन आज प्रत्येक वाटेवर प्रेमाच्या पाऊलखुणा शोधायला लागलंए ,

का जाणे पण त्यांना शोधता शोधता स्वतःला नव्याने सापडवायला लागलंए ,

म्हणजे आता त्या मनाला खऱ्या प्रेमाचे गुपित समजून घेण्याची गरज भासायला लागली ए.


Rate this content
Log in