महाराष्ट्रात ल्या संताची भक्ती
महाराष्ट्रात ल्या संताची भक्ती
अहो माझं थोर भाग्य
वासुदेवा तुझा लागला छंद
संत थोरांचा तो ठेवा
मार्ग दावितो मजला
भक्त पुंडलिका साठी देवा
झालासी तू विठोबा
नामदेवाच्या हट्टा पायी
ग्रहण प्रसाद करिशी
सावता च्या मळ्यामध्ये
फुलतोस पांडूरंगा
गोरा कुंभारा च्या मडक्या ला
देशी आकार भक्ती चा
धन्य धन्य तो एकनाथ
त्याच्या घरी तू भरिशी माठ
जना गाते भक्ती च्या ओव्या
तू विसावी शी तीच्या घराला
शिव भक्त नरहरी सोन
ाराला
बोलाविशी तू तूझ्या मंदिरा
जन डावलिती चोखामेळ्या ला
तू दर्शन देशी तूझ्या दरबारा
तू करविशी निवृत्ती ला माय-बाप
ज्ञानदेव,सोपान,मुक्ताई चा
संत सखू चे दूर करिशी दुःख
कान्होपात्रा ला दाविशी भक्ती ची वाट
तुकारामांच्या किर्तनात
नाचशी तू पांडूरंगा
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतून
जीवनाचा मार्ग दाविशी आम्हाला
संत सेना महाराज करिती
किर्तन, भजने राजदरबारी
संत बाळू मामा होई
दीन दुबळ्यां चा कैवारी .