आजची स्री
आजची स्री
तू नाही जानकि
तू नाही द्रोपदि
तू नाही राधा
तू नाही अहिल्या
तू आहेस आजची नारी
झुंजार विचारांची
तूझ्या स्वप्नांचा पक्षी
उडू दे आकाशी
कर्तव्याची जाण ठेवूनी
सर्वांचा मान राखूनी
तू निभावशी
सर्व नाती.
का वाट पाहशी
कोण्या राम कृष्णाची
लज्जा राखण्या
तूझी स्वतः ची
तूच आख अवतिभवती
लक्ष्मण रेखा नीती ची
मग नाही हिम्मत कोणाची
तूजला हरवण्याची
