STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

4  

Trupti Naware

Inspirational

फाटलेले पान

फाटलेले पान

1 min
41K


माझ्या डायरीच्या असंख्य पानांमधलं फाटलेलं ते पान...

फाडताही येईना..कारण

बाकीची पानं त्याच्याशी

घट्ट बांधलेली होती ..

काही लिहीताही येईना...कारण

आयुष्याच्या काही महत्त्वाच्या ओळीच मी त्यावर लिहीलेल्या होत्या..

डायरी उघडली की ,ते समोर यायचं ..

बंद केली की ,मधेच अडकायचं

इतकं त्याच नि माझं नातं

बांधीलकीचं होतं ...

डायरीचं काय पण ते पानही

मला जपायचं होतं ...

फाटलेलं म्हणून मी त्याला कमी

लेखलं फार..पण

त्याच्यात पाहीलं की

आपुलकी दिसायची अपार

मी बरेचदा प्रयत्न केला

घडी घालून दुर्लक्षिण्याचा

पण परत परत आठवायचा

अर्थ त्यावरच्या शब्दांचा

परत उकलायची घडी

नि न्याहाळायची शब्द

पण ते फाटलेलं

म्हणून मी निस्तब्ध

एक एक नविन पान

जुळत गेले डायरीचे

शब्दांसोबत वाढत गेले

मोल माझ्या विचारांचे

कां फाटले ते पान ??

कळलेच नाही कधी

फक्त निरपेक्ष मैञीची

त्याने दिली मला संधी..

ही नशीबाची थट्टा की

व्यावहारिकता होती ..अनुबंधाची

सांगूही शकत नव्हते

मी व्यथा फाटलेल्या पानाची...!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational