STORYMIRROR

GANESH GHANSAWANT

Inspirational

4  

GANESH GHANSAWANT

Inspirational

माणसाचे गाणे

माणसाचे गाणे

1 min
43.8K




मृत्यूलाही जिंकता यावे असे जगावे जीणे

माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे !धृ!


जात धर्म विसरुनी एकत्र यावे साऱ्यांनी

समतेचा हाच संदेश द्यावा लखलखणाऱ्या ताऱ्यांनी

भुकेल्यास्तव वेचावे एक एक दाणे !१!

माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे...


दुबळा असो व असो पंगू नको कुणाचाही छळ

सर्वांच्याच अंगी भिनवू एकजुटीचेच बळ

भांडण-तंटे मिटाया नकोच कुठले ठाणे !२!

माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे...



कुंपणाने खावे शेत असे न घडो कुठेही

एकत्वाची शिकवण देती मिळून सारे बोटेही

दोन्ही बाजू सारख्याच असेच घडवू नाणे !३!

माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे...


शत्रुलाही शिकवा आपल्या प्रेमाचीच भाषा

जीवनात ठेवू सदैव आपुल्या बंधुतेची आशा

इतिहासात रचुया आपण माणुसकीची पाने !४!

माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational