Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

GANESH GHANSAWANT

Inspirational

4  

GANESH GHANSAWANT

Inspirational

माय असते घरात

माय असते घरात

1 min
13.3K


माय असते घरात तोपर्यंत

असत घराला घरपण

तिच्या माघारी

उभ्या असतात चार भिंती चहुबाजूंनी

व वरती माया हरवलेलं छप्पर

पण घरपण असलेलं नसत ते घर


आई असतांना

सारवल्या जातात

सणासुदीला मातीच्या पडक्या भिंती

अन आणलं जात त्या भिंतींना

ताजमहालाच्या संगमरवरी भिंतीपेक्षाही

जास्त सौंदर्य

कारण ती भिंत नसते

कुण्या कारागिरांना लेपलेली

ती असते

वात झालेल्या

मायेच्या हाताने सारवलेली


हाताची बोटेही वाकत नाहीत

जेव्हा

तेव्हासुद्धा

मायेचा हात प्रत्येक देवळीतून पोतरा

घेत असतो

माय फक्त भिंतीच सारवत नाही

तर ती समदं आंगण देखील

गाई बैलाच्या शेणाने

सडा शिंपून माखून घेते

याच कारणही तिला ठाऊक असत

ती मनते बाळा

घराची कळा अंगणावरून कळते

मग अंगण तसंच ठेवून कस चालायचं रे


पांढऱ्या मातीन सारवलेल्या भिंती

अन सडा शिंपलेलं आंगण

म्हणजे मायच्या हातची अदभुत कलाकृतीच


दिवाळीच्या दिवशी

मायेन केलेला गाई बैलांचा गोठा,चूल

आता कुणीच करत नाही

शेणाच्या गोवऱ्याही टाकणं

आता कुणाला जमत नाही

कारण तिची लेकरं

आता शिकलीत खूप

पण विसरत चाललीय

आपल्याच मायेची शिकवणं

म्हणूनच

पोळ्याच्या दिवशीही

जुन्या झालेल्या बैलाला

ठेवलं जातं शेतातच

व नव्याचा पोळा केला जातो

कळशी, जु, औताची पास

नाही रंगवली जात

कात व चुन्यानं

नाही मांडलं जात

बाजेवर जुपन


म्हणून च माय असताना

घर राहत एकत्र बांधून

सगळे सुख दुःख येतात

तिच्या आश्रयाने नांदून


माय असतांना

घराला असतं घरपण

ती कधीच हरवू देत नाही

माणसाचं माणूसपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational