मित्रा
मित्रा
मित्रा,
तू तूझ्या संघटनेत काम कर
मी माझ्या संघटनेत काम करताे
अापल्या मैत्रीत मात्र काेणतीच
संघटना येऊ देऊ नकाेस
तू तुझ्या विचारधारेनं चाल
मी माझ्या विचारधारेनं चालताे
दाेघांचीही विचारधारा जाेपर्यंत
एक हाेत नाही, ताेपर्यंत तरी
तुझ्या-माझ्या नात्यामध्ये, मैत्रीमध्ये
कोणतीच विचारधारा आणू नकोस
तू मार्क्स, लेनिन,माओ, अण्णाभाऊ, पानसरे
वाच, तो तुला आवडतो,
तुझ्या मनात घर करून जातो
मी मात्र छत्रपती शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर
वाचतो; कारण ते माझ्या मनात घर करून जातात
मित्रा,
तू कम्युनिस्ट असो वा मार्क्सवादी
मी समाजवादी असो वा आंबेडकरवादी
एक वेळेस तरी आपण मानवतावादी बनुया
जागोजागी आपण मानवतेचं निशाण रोवूया
खूप झालं मित्रा शेवटी इतकचं मनातलं सांगतो
तुझा लाल सलाम असो
वा माझा जयभीम असो
एक वेळ तरी आपण सार काही सोडुया
अन् माणुसकीची नवी संघटना
तुझ्या-माझ्या रक्तात गाडूया.
प्रिय मित्र सचिन पापालाल चव्हाण यांस समर्पित.....
मैत्री दिनाची भेट
सचिनला....
