हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
माय देवी सरसोती
माहं चुकलं कावं काई
नाही धाडलं साळंत
मले वाचाले येत नाही
जाय म्हणती कामाले
घरी सांभाळ भावाले
घरकामात मदत
कर तुझ्या वो मायले
आजूबाजूच्या साऱ्या पोरी
माय जाती वो साळंत
त्यांच्याकडं मी राह्यती
कवतुकाने वो पाह्यतं
घालती साळंची कापडं
लई दिसती झकासं
लाल लाल रिबिनीची
फुलं पाडती वो खास
छोटुछोटुलं दप्तर
लटकावती पाठीवर
त्यातली रंगीत गं बुकं
छान लिवती पाटीवर
माय घडव चिमित्कार
म्या बी जाईन साळंत
शिकुनश्यान झाली मोठी
मले सपान हे पडतं
