STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

परतुनी ये अंगणी...

परतुनी ये अंगणी...

1 min
13

होई काहिली काहिली

नाही झाडांची सावली

कुठे दिसेनात झाडं

सारी जंगले तोडली


चिऊताई व्याकुळली

नाही पिण्यासाठी पाणी

चिवचिव चिमण्यांची 

नाही पाखरांची गाणी


कुठे बांधणार खोपा

नाही अंगणात झाडं

बंद दाराची संस्कृती

बंद घराची कवाडं


काऊ चिऊची ती गाणी 

मुलं विसरली आता

चिऊ काऊचा तो घास

देत होती खाता खाता 


येगं येगं चिऊताई 

चिऊ अंगणी यायची

चिऊ काऊचा तो घास 

मुलासंगे ती खायची


खूप खूप लावा झाडं

ठेवा थोडे दाणापाणी 

हाक मारा आणि म्हणा

परतुनी ये अंगणी 


Rate this content
Log in