STORYMIRROR

Aruna Garje

Classics

4  

Aruna Garje

Classics

कविता

कविता

1 min
11

अरे! वेड्या मना...

काही कळेना मनाचं
होई वाऱ्यावरी स्वार
कसं पकडू पकडू
उडे लगेच भरार

कसे पकडू तयाला
त्याचे पळणे बेफाम
वाटे पकडावे त्याला
गळा घालावा लगाम

त्याचे वेडावणे मला
कधी वाटे जीवघेणे
कसे समजावू त्याला
बरे नव्हे हे वागणे 

कधी वाटे या मनाला
फिरू द्यावे वाऱ्यावर
असे बेधुंद स्वच्छंद
होऊ द्यावे सैरभैर

फिरुनिया भिरभिर
जेव्हा होईल ते स्थिर
मग हळूच सांगावे
आता थांब घडीभर

 तना मनाचं गणित
कधी सुटले का कुणा?
जरा सांभाळ स्वतःला
अरे! माझ्या वेड्या मना

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics