STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

कविता

कविता

1 min
11

हायकू

 मोलाचे पाश...

पृथ्वी म्हणाली
ताप होतो असह्य
 व्हावा सुसह्य

 ओल जलाची
माझ्या देहावरची
 फार मोलाची

 भारीच झाले
वायुचे प्रदुषण
 सरले वन

 सूर्यही झाला
अग्नीचा तप्त गोळा
 जाळती ज्वाळा

 निळे आकाश
 हिरवी वनराई
 उदास होई

 सृष्टीचे रूप
 पालटे क्षणाक्षणा
 सांगावे कुणा

अग्नी नि जल
पृथ्वी वायू आकाश
 मोलाचे पाश

 @अरुणा गर्जे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy