कविता
कविता
मनाचा दरवाजा...
दरवाजा या मनाचा
जेव्हा उघडा राहिला
भाव भावनांनी तिथे
त्यांचा डेरा जमविला
मनाचिया अंगणात
चाले आनंदाने मस्ती
कधी येई रंगामधी
सुख दुःखाची ती कुस्ती
त्यात हसणे रुसणे
सारे मनाचेच खेळ
राग रुसवा जाउनी
कधी होई त्यांचा मेळ
कसा बंद करू सांगा
दरवाजा या मनाचा
भारी मोलाचा खजिना
नाही दवडू द्यायचा
दरवाजा नि खिडक्या
मनाचिया बंद केल्या
त्यांच्या जुन्या आठवणी
त्यांना सोडुनिया गेल्या
@अरुणा गर्जे
