असं माहेर माहेर...
असं माहेर माहेर...
असं माहेर माहेर...
असं माहेर माहेर
काय सांगू त्याची गोट
दाट दाट हिरवळ
वाट धावते सुसाट
वाट धावते सुसाट
मन पुढे वाऱ्यागत
दारी उभी दिसे माय
वाट लेकीची पाहत
वाट लेकीची पाहत
बाप येरझाऱ्या घाली
कधी बघीन लेकीला
जीव होई वरखाली
जीव होई वरखाली
तेव्हा झुळूक हवेची
धीर देऊन सांगते
चिंता करू नका तिची
चिंता करू नका तिची
आलो भेटुनी लेकीला
कावळ्याची कावकाव
देई दिलासा मनाला
देई दिलासा मनाला
असं माहेर माहेर
सांगा विसरेल कसे?
मनी वसलेलं घर
@अरुणा गर्जे
