कविता
कविता
सांगू नये कुणाला ...
सांगू नये कुणालाच
ऐकणार कोण येथे
ओझे ज्याचेच तयाला
जड झाले आज जेथे
काळजीत आज जो तो
दुःख ज्याचे त्याचे मोठे
खचलेला बळीराजा
ऐकणारे गेले कोठे?
ज्यांच्याकडे खूप पैसा
तेही आज रडताहे
पैशाविन जगू कैसा
रडणारे इथे आहे
मोबाईल हाती आला
हातातून मुले गेली
ओरडणे फक्त हाती
नाही कुणी त्यांचे वाली
करणारे कुणी नाही
बोलणारे खूप सारे
नुसत्याच घोषणा नि
पोकळच सारे नारे
पांडुरंगा बा विठ्ठला
पाहतोस तू ही सारे
तुझ्याविना सांग इथे
आहे कोण ऐकणारे?
@अरुणा गर्जे
