सेल्फी...
सेल्फी...
सेल्फी...
येगं येगं म्याऊ
सेल्फी आपण घेऊ
नको करू म्यांव म्यांव
खाऊ नको जास्त भाव
माझ्याकडे बघ अशी
हसते बघ मी छानशी
जीभ नको दाखव दात
कर माझ्यासारखा हात
जीभ दाखवली म्याऊने
काढली सेल्फी घाईने
छान छान निघाली सेल्फी
सायंकाळी खाऊ कुल्फी
कर म्याऊ थोडी घाई
बघ आवाज देते आई
आईजवळ पटकन जाऊ
गुटूगुटू दूधभात खाऊ
खातांना म्याऊ म्हणते कशी
घ्यायची का सेल्फी छानशी?
@अरुणा गर्जे
