माती आणि नाती...
माती आणि नाती...
माती आणि नाती...
मातीतली सरे ओल
तेव्हा भेगाळते भूई
सरे प्रेमाची ती ओल
तडा नात्याला हो जाई
ओल सरली मातीची
झाली पडीक जमीन
नात्यांमधे नाही प्रेम
नाते कसे प्रेमाविन
नाते माय लेकराचे
आज विसरे लेकरू
वृद्धाश्रमी आठवते
तिलातिचेच कोकरू
बांधावरी मातीसाठी
भाऊ भाऊ भांडतात
माती धाय धाय रडे
रक्त सांडते शेतात
नाती आणि माती
यांची
असे जोडलेली नाळ
ओल संपता त्यातील
काय बाकी हो उरेल?
@अरुणा गर्जे
