जीवनाची परीक्षा
जीवनाची परीक्षा
जीवनाची परीक्षा....
जीवनाची परीक्षा या
कधी चुकली का कुणा?
देतो सतत परीक्षा
जीवनात पुन्हा पुन्हा
कधी अवघड तर
कधी भारीच त्रासाची
सोपी नसते परीक्षा
तरी देत राहायची
नशीबात लिहिलेले
कधी चुकले ना कुणा
चुपचाप राहायचे
शांत करायचे मना
परीक्षाही ठरलेली
संकटात आणणारी
सारे हे अनपेक्षित
सर्वांनाच छळणारी
देवबाप्पा! पुरे कर
कशासाठी ही रे शिक्षा?
थकलोय रे खूप आता
देता देता ही परीक्षा
@अरुणा गर्जे
