कावळा अन् बगळा
कावळा अन् बगळा
ढुम ढुम ढमाक, ढुम ढुम ढमाक
ऐका ऐका मुलांनो, गोष्ट सांगते एक
एक होते गाव, गावात होती नदी
कावळा अन् बगळा, भेटायचे कधीमधी
बगळ्याला पाहून कावळा, मनामध्ये झुरे
आपण काळे काळे, बगळोबा केवढे गोरे
धीर करून त्यांनी, विचारले बगळोबाला
तुम्ही एवढे गोरेपान, मी का हो काळा
बगळा होता लबाड, बोले तो कसा
कावळोबा दगडाने, अंग घासा खसाखसा
बोलणे वाटले खरे, अंग घासले खसाखसा
रक्तबंबाळ कावळोबा, झाली त्यांची दशा
रंग आणि रुपाची, तेवढ्यापुरती नशा
बुद्धीने काम घ्या, नाही होणार हशा
बुद्धी आणि गुणानेच, पुढे पुढे जायचे
रंगरुप मुलांनो, नसते आपल्या हातचे