माझी माय मराठी..
माझी माय मराठी..
जन्म सार्थकी लागला
तुझ्या कुशीत येवूनी
माय माझी तू मराठी
जाते सुखद अनुभव देऊनी
माय माझी तू मराठी
जणू अमृताची वाणी
आपुलकी आणि गोडवा
नांदतो तुझ्या अंगणी
शब्द अंलकारानी सजली
संस्कार अन् संस्कृती
धुरंदर जन्म माझा
त्यात तुझी नवलाई
ठाई ठाई मज भेटे
मराठीची रे पुण्याई
उपनिषदांचा ठेवा
ज्ञानेश्वरी चा रे गाभा
पसायदान मागते
माझ्या मराठीची आभा
तुझ्या कौतुकाचा दासी मी
जन्मभर राहावे, तुझ्या वाणीचे
मी नित अमृत कण प्राषावे..
