STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

4  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

आई

आई

1 min
278


'आ' म्हणजे आत्मा..

'ई' म्हणजे ईश्वर चा अंश...

आई म्हणजे जीवनाची सुरुवात...

बाबा म्हणजे आपल्या अस्तित्वाची पावती...!!

मातॄदेवो भव: आई प्रथम गुरु...


आई माझ्या जीवनाचा कल्पतरु...!!

आई म्हणजे वात्सल्याचा मूर्तीमंत झरा...

आई म्हणजे आभाळाएवढी माया..!!

आई देते जीवनास आकार....

आईचे संस्कार म्हणजे जीवनाचा आधार...!!


आईची शिस्त अपत्यांची पुंजी....

आईचे विचार मनात देतात रुंजी..!!

आई म्हणजे एक कणखर प्रशिक्षक...

आईचा प्रत्येक विचार करतो मार्गदर्शक..!!


आयुष्यभर आई काबाडकष्ट करत असते....

आपल्या अपत्यांच्या सुखासाठी झटत असते...!!

विसरुन जाते जी स्वता:चेच अस्तित्व....

मूलांमध्येच पहाते स्वतः चे विश्व...!!


आई म्हणजे नि: स्वार्थी माया.....

आई म्हणजे उन्हातील छाया....!!

परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे आई....

प्रत्येक स्त्रीस मातॄत्वाचा आनंद दे गं अंबाबाई


मनापासून दंडवत माझे सर्व मातॄशकतींना सदैव.,.

तुम्ही निरोगी,आनंदी, दीर्घायू असावे...

हीच प्रार्थना आई जगदंबेच्या चरणीं....

आई माझी प्रेमळ सखी तर कधी 

अनमोल आ

हे तिची नि माझी मैञी...!!


आईनेच बनवले स्वावलंबी मला....

त्यागून स्वत:ची स्वप्ने घडविले मला...!!

माझी आई माझ्या व्यक्तिमत्त्वाची उत्तम शिल्पकार..!!

आई मूळेच सदैव लाभतो यशाचा प्रत्येक क्षण...

तिचे आशिर्वाद म्हणजे जीवनाचे आंदण...!!


कन्यादानाच्या वेळी ती खूप खूप रडते...

मूलीच्या सुखाची तीच तर दॄष्ट काढते....!!

आपल्याच कन्येत ती तिचे रुप पहाते...

नातीच्या रुपात आपलेच बालपण नव्याने जगते...!!

कन्या, पत्नी,बहिण,आई,वहिनी,सखी, काकू,मामी,मावशी,आत्या...

अनेक नात्यांमध्ये दडलेली असते आईचीच प्रेमळ सावली...!!

आई म्हणजे साऱ्या विश्वाची माऊली....!!!


थोर मातॄभक्त परशुराम असो की कौसल्या नंदन ...

 प्रभु श्रीराम असो की कॄष्ण कन्हैया यशोदा नंदन...

सॄष्टीनिर्माता हरि करितो आईस वंदन..!!

आईची थोरवी शब्दांत गुंफणे अवघडच आहे..

आई या शब्दांतच माझे सारे विश्व सामावलेले आहे..!!


घराघरांत नांदूदे आईस हर्षाने मनभरं....

तिनेच तर घर सजवलेय आयुष्यभर...!

तिचे वात्सल्य हा घराचा आत्मा आहे...

'वडिल' जर जीवनाचा भक्कम पाया आहेत...

'आई'जीवनाचा उत्तुंग कळस आहे...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational