पाऊस
पाऊस
मेघगर्जनेची चाहूल भोवताली.....
विद्युल्लता कडाडली नभांतूनी.....
अंतरी सुखावली अवनी मनांतूनी.....
मॄदुगंधाचे अत्तर शिंपडूनी सभोवताली...
स्वागतासाठी पाऊसाच्या हिरवा शालू नेसूनी....
नानाविध सुमनांचा माळूनी गजरा ....
'फुलराणी' ती 'अवनी' आज सुखावली अंतरी....!!
धो धो जोरदारपणे पाऊस कोसळला धरिञीवर....
इतकी का तापलीस गं पुसले त्याने क्षणभरं....
तू येत नव्हतास ना म्हणून चिडले होते तूझ्यावर..!!
अगं सय तूझी कायमच असते अंतरी.....
अरे मगं बरसायचेस ना अवनीवरी...!!
हे बघं आता तरी आल्यावर गोड बोल गं राणी....
अव्यक्त भावना समजून घे ना तू कधीतरी..!!
उगीच का सजलीये मी हिरवाई फुलवूनी....
स्वागतासाठी तूझ्य सज्ज झालीये सारी सॄष्टीची नवलाई...!!
बरं बरं काय चालू आहे तूमच्या नभांगणामध्ये..???
सर्व काही सुंदर गं फक्त तूझी आहे कमतरता....!!!
तूझ्या त्या प्रदूषणामुळे मेघांना ग्रासलयं फुफ्फुसाच्या आजारांनी...!!
आमचा अख्खा रंग काळवंडलाय गं...!!
ग्रहांच्या परीक्षणांच्या यंञामुळे आमच्या कडे पण...
होतेय चांगलेच ध्वनी प्रदुषण...!!
कधी कोणता नवा पाहुणा येईल याच
प्रतीक्षेत असतो मी दिवसभरं...!!
का रे का असे का रे मेघश्यामा सुंदरा....!!
वाटते उगीच मजला तू काही निरोप धाडलेला असावा..!!
अरे मगं एवढीच आठवण येत असते तर....
मॄग नक्षञावरच अवतरायचेस ना..??
हो तर तसेच पक्कं ठरवलेल असतं मी...
पण तूझ्या प्रदुषणांमुळे ओझोनच्या टोलनाक्यावर..
थांबावं लागतं गं दिवसभरं...!!
पेंडिग फाईल्स पूर्ण करत येतो एकदाचे भारतभूमीवर...
हो मगं मी तर केरळात तूझ्या प्रतीक्षेतच असते रे दिवसभरं....!!
एक वर्षांनी भेटतो आपणं कसला हर्षोल्लास होतो ना रे..!!
साऱ्या अवनीवर भारतभूमी आपली भेटणयाची...
कायमच असते आवडते ठिकाणं.....!!
इथल्या कणांकणांत ंआहे भगवंतांचा वास....
अगं राधे आता तरी जरा हास....!!
हे बघं आलाच आहेस तर जरा....
समजूतदारपणे वाग.....
तूझ्या अंकाऊंट मधले हिशोब नीट कर...
जिथे गरज आहे तिथेच बरस....!!
माझ्या सर्व लेकींना,सरितांना जर वळणं लाव....
उगाच बापलेकींच्या लाडाने वहावत जातात त्या बिनधास्त...!!
एकेकीला आवरत नाकीनऊ येतात मलाच मगं...!!
माझ्या जावयाला सागराला नका उगीच उफळवू तुम्ही...!!
अगं तळे,वॄक्ष,वेली ही मेहुणे मंडळी घेतात गं सावरुन...!!
हो हो पणं यावर्षी जरा जपूनच बरसा हो मेघश्यामा...
अधिकमास आहे हो यावर्षी श्रीपुरुषोत्तमांचा...!!
हे बरंय गं तूझं जावयांसाठी आम्हांस एवढा जाच..!!
अहो परमभाग्य आपले एवढ्या लेकी आणि जावई...!!
अधिकमासाचे पुण्य पदरी पाडून घेणे....
प्रदुषणांच्या शापातून तेवढीच मिळेल मुक्तता...!!
बरं बरं तू म्हणशील तसे बरसून पहातो आता...!
चल राणी कुठे जायचे विहाराला....
वैतागलोय गं मी नभांतील गर्दीला....
जरा एकांत ठिकाणी मारुया फेरफटका....
अहो चला जाऊ मगं श्रीक्षेञ हरिद्वाराला.....
हो तरं जाऊ आपल्या लाडक्या जेष्ठ कन्येला भेटायला...!!
आपली जेष्ठ कन्या 'गंगा'आहेच जीवनदायनी.....
तिला भेटलो की सगळे कुटुंब भेटते आनंद होतो मनांतूनी...!!
अहो चला आपण देखील मोक्षप्राप्ती साठी...
करुया लक्ष्मीनारायण रुपातील लेकजावयांचे पूजन..!!
श्रीसूर्यनारायणांच्या साक्षीने करुया मेघराजांचे स्तवन....
गौरीशंकराचा आशिष असला की पावेल ते स्तवन..!!
हो तरं चला आता सामानांची करा सावरासावर....
गंगासागराची भेट घेऊन येतो मी तोवर घटकाभरं...!!
धरतीमाता आनंदाने सजली अंतरी सुखावली....
अनारसे बत्तास्यांचे वाण घेऊनी आले मेघश्याम.....!!
देवभूमी श्रीक्षेत्र ऋषिकेशला झाली घनश्यामांची भेट....!!
बद्रीनाथ, केदारनाथ सगळीकडचा घेऊन पाहुणचार....
गंगामायीसोबतीचे दिवस संपूनी गेले चार..!!
परिवाराची भेट ,आटपूनी सारे सोपस्कार....
निरोपाच्या क्षणीं नेञ पाणावले मेघश्यामांचे...!!
धरतीस ही आला अश्रुंचा महापूर...!!!
लवकरच भेटू आश्वासन देत मेघश्याम झाले मार्गस्थ...!!
सयींच्या हिंदोळ्यावर विसावली अवनी वर्षभरं...!!
अचानक वीज कडाडली नभांतूनी....
"सुखरुप पोहोचलो गं राधाराणी...!!
मेघश्याम उत्तरले मेघांतूनी...!!
काळजी घ्या,वेळेवर या ठरल्याप्रमाणे..
धरतीमाता उच्चारली मनांतूनी.....
परमात्मयाने इंद्रधनुष्याचा आशिर्वाद दिला...
एक श्रावणसरी अचानक बरसून गेली....
तिच्या नुसत्या येण्याने अवनीस मिळाली नवलाई..!!
नवचैतन्याची चाहूल,गौराईंची लगबगं सुरु झाली..
मेघश्यामांच्या अधून मधून येण्याने....
दिवाळसण येऊन ठेपला....
देवदीपावलीसाठी मेघश्याम पोहोचले स्वर्गांत....
फुलली फळली धरित्रीमाता सुखावली मनांत...
अंतरी ओढ कायम मेघश्यामांच्या भेटीची....
राधाराणी अवनी मेघश्यामांच्या प्रतीक्षेत ....
पाऊस आणि अवनीची ही गोड कहाणी...
गौरीने वर्णिली कुवतीनुसार मनापासून....
पाऊस आणि अवनीची कहाणी...!!!