दीपावली
दीपावली
सण वर्षाचा शुभ दीपावलीचा...
अंध:कारातूनी प्रकाशाकडील वाटचालीचा..!!
भारतीय परंपरेतील मुख्य सण दिव्यांच्या पूजनाचा....
सण हर्षाचा सण आपल्या आवडत्या दीपावलीचा..!!
श्रीलक्ष्मी गणेश आणि शारदेच्या पूजनाचा...
'दिवा पाहूनी लक्ष्मी येते' या उक्तीच्या स्मरणाचा..!!
दीपावलीच्या पर्वाची महती अगाध आहे...
पुराणकथेत विविध कथांचा महिमा आहे...!
चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येत परतले हर्षून प्रजेने स्वागतासाठी दीपावली सणाची सुरुवात केली..!!
गोवत्सपूजन,गोवर्धनपर्वत पूजनाचा....
श्रीकृष्णांच्या 'गोवर्धन अवतार' पूजनाचा...!!
पशु-पक्षी-प्राणी पर्वत निसर्गाच्या पूजनाचा...
परोपकाराची परतफेड करण्याचा सण दीपावलीचा...!!
नूतन वस्त्र, मिष्टांन्न,फटाके आणि भेटवस्तूंची रेलचेल...
दीपावली म्हणजे आनंदाची घराघरांत रेलचेल...!!
चिवडा चकली शंकरपाळी लाडू आणि करंजी...
शेव पापडी बाकरवडी आणि बालुशाही....!!
दीपावलीच्या सणांची लज्जत घेण्यात नाही देण्यात आहे..
दान केल्याने श्रीलक्ष्मी नारायणाची कॄपा बरसते....
आनंदाने गरजवंतांचे दु:ख क्षणभरं विसावते...!!
अनाथांची वंचितांची ठेवावी दीपावलीस 'सय'....
ती सुद्धा आपलीच देशबांधव होय..!!
अहं पणाचा विसर पडावा मनांत ज्ञानाचा प्रकाश पडावा अंतरी...
दिवा आणि वातीसम परोपकाराची सय असावी अंतरी...!!
दीपावलीच्या दिनी नको कोणी उपाशी...
कर जोडोनी ही प्रार्थना करावी देवापाशी...!!
<
br>
सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांची सय ठेवावी....
एक पणती 'शहीद' सैनिक बांधवांसाठी लावावी...!!
करावी आपण निश्चिंतपणे दीपावली साजरी....
म्हणूनी भारतीय सैनिक लढत असती सीमेवरती....!!
मातॄभूमीच्या सेवेसाठी 'तो'भारतमातेचा सुपूञ
'ती'भारतमातेची वीरांगना परिधान करतात शस्त्र...!!
भारतीय सैनिक जेव्हा लावतात सीमेवर एक पणती...
'दिवा पाहूनी लक्ष्मी येते' त्यावेळी भारतीय सीमेवरती...!!
सुखावते ती लक्ष्मी माता देते आशिष सैनिकांना...
नारायणांना ओवाळणी मागते मगं लक्ष्मीमाता...!!
हे प्रभु बल बुद्धी आणि विजयाचा आशिष द्यावा मज लेकरांना....
तथास्तु म्हणूनी श्रीनारायण आशिर्वाद देती भारतमातेला...!!
विजयाची ही अखंड परंपरा चालविती भारतीय प्रजा...
प्रभु श्रीरामांच्या नामघोषांत दीपावली साजरी करते भारतीय प्रजा....!!
लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघतो....
अंध:कारास भारतातूनी पळवून लावतो....!!
एकवटतो भारतीय समाज सण दीपावलीला धनत्रयोदशी,....
दिवाळी लक्ष्मीपूजन,पाडवा आणि भाऊबीजेला....!!
हर्षोल्लासाचे पर्व चालू रहाते 'देवदीपावली'पर्यंत...
श्रीतुलसी दामोदर शुभविवाहा पर्यंत....!!
दीपावलीच्या सणाने उत्साह संचारतो...
दुःखाचा क्षणभरं विसर पडतो....!!
जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ...
दीपावली म्हणजे आनंदाची उधळणं...!!