मेघ सरिता
मेघ सरिता
ती खळखळती 'सरिता' लावण्यवती....
मेघावर जडली तीची प्रीती.....
उंच डोंगर कपाऱ्यातूनी....
गात जाई ती प्रीतगाणी....
तिची साथ मेघ ऐके नभातूंनी....
धरणीमाता साक्ष ठेवूनी...
अंबरासी आर्त हाक ती देत असे ...
'मेघ' हा माझा प्रीतसखा...
मेघ भासे मजला 'मेघश्याम'...
राधेश्याम सारखी पविञ आमची प्रीती....
आशिषांची अनुमती द्यावी आम्हाप्रती...!!
मुक्त,अवखळ परी धीट ती 'समुद्रकन्या'....
तो मिष्कील, हसरा 'नंदकुमार'...
प्रीतीच्या सरी कोसळल्या अवनीवरती....
'मेघश्याम' अवतरले मेघातूनी....!!
आशिर्वादांचा पडला पाऊस चिरंतरी....
'मेघसरिता' पार सुखावले अंतरी...!!
राधाराणी ती हसली ऐकूनी हे प्रीतगुज...
मेघश्याम गाई बासूरीने हे प्रीतगीत....!!
बासूरींचे सूर निनादले अवनीवरती...
वीजा कडाडल्या गगनावरी....
मेघ बरसले सरी वर सरी....
सरितेची कळी खूलली गालावरी.....!!
प्रीतीस तिच्या लाभले सौभाग्याचे आंदण...
मेघास मिळाले आकाशातील चांदणे...!!
संसार सुखाचा अविरत चाले आजही....
तो चिडला की बरसतो मेघापरी....
ती हसरी सरिता समजूनी घेते त्यांस मनोमनी..
राधाकृष्णांची आवडती ही गोड कहाणी...
आज परिसली मी ती सर्वांसाठी...!!

