##प्रीतसरी##डॉ##गौरी##
##प्रीतसरी##डॉ##गौरी##
मेघ दाटले नभी
तूझ्या सयींच्या सरी
कोसळल्या मनी..
तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर..
काळजावर कोरली ती सोनेरी सर..
अव्यक्त भावनांनी दिला
अबोली होकार..
सरीवर सर बरसली बेभान..
तिने घेतला आज तूझ्या ही मनीचा ठाव..
तो चोरटा कटाक्ष ती मंजुळ झुळुक..
बघता बघता ती पोहचली तूझ्या जवळ..
मेघ दाटले नभी...
तिच्या सयींच्या सरी..
आठवल्या कितीतरी..
स्वप्नांची ती परीकथा..
चंचलतेचा तिचा वावर..
सरीवर सर..
माजला मनात काहूर..
सुखद क्षणांचा मनात आर्जव..
मेघांनीच घेतला प्रीतीचा ठाव..
मेघ दाटले नभी....
प्रीत आजही जागली मनी..
मर्यादांच्या पल्याड कोरली बंदीस्त...
दाटलेल्या मेघांनीच कोसळण्या घेतला..
सरीचाच आजवर आधार..
तूझ्या माझ्या मनीला..
कायम सयींचाच आधार....!!!
मेघ दाटले नभी..
तूझ्या सयींच्या सरी..
कोसळल्या मनी...!!!