STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

3  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

श्रावणसरी डॉ.गौरी

श्रावणसरी डॉ.गौरी

2 mins
207


श्रावण सरींची आगळीवेगळी कहाणी....

नित्य एक नवीन 'पौराणिक कहाणी'...

कहाणी वाचन,गुळ-फुटाण्यांचा प्रसाद....

घरोघरी मिळत असे आमच्या आवडीचा प्रसाद...!!

श्रावण सरी धो धो बरसणाऱ्या नभांतूनी.....

माहेरची साद देई सवाष्णींना मनांतूनी..!!

मंगळागौरींच्या सणाला नववधूंची रेलचेल....

मंगळागौरींच्या खेळांची उत्सवांतूनी चहल पहल..!!

सौभाग्यवॄद्धीसाठी देवी मंगळागौरींचे पूजन...

शिवपार्वतींचे पवित्र पूजन अर्चन...!!

श्रावणात घननीळा बरसतो अवनीवरी....

इंद्रधनुंची चिञकला उमटते नभावरी...!!

श्रावणात नित्यच असते सणांची वर्दळ...

बाहेरची व घरांतील कामे आटोपताना महिलांची होते तारांबळ..!!

श्रावणी सोमवार,मंगळागौरी,आदित्य राणुबाई,..

अनघालक्ष्मी,वरदलक्ष्मी,मुंजा पूजन,आदित्यपूजन..!!

प्रत्येक दिवसाची विशेष महत्त्वपूर्ण कहाणी...!!

नागपंचमी, राखीपौर्णिमा तर कुठे नारळीपौर्णिमा..

दक्षिण भारतात असते 'ओनम' ची लगीनघाई...!!

समुद्रपूजनाची अनोखी कोळी बांधवांची परंपरा....

उत्तर भारतात भोले बर्फानी अमरनाथ याञेची सांगता...!!

श्रावणी सोमवारी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व अवनीवरी...

गौरीशंकरांचा वास असतो श्रावणात अवनीवरी...!!

सण आनंदाचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा असतो श्रावणात....

गोपाळकाला, दहीहंडीचा हर्षोल्लास होतो जनमानसांत...!!

बाळकृष्ण, राधाकृष्ण, गोपिका आणि गोकुळ चोहिकडे...

मातीच्या गोकुळातच श्रीकृष्णांच

ी बाललीला रंगते..!!

मध्यराञी बाराच्या ठोक्याला सारा भारत साजरा करतो श्रीकृष्णांचा जन्मोत्सव.....

अंधकार सारा दूर करण्यासाठी आळवितो भगवंतास 

भक्तांचा जनसागर....

राधेकृष्ण, गोपाळकृष्ण चा सर्वञ गुंजतो गजर....!!

श्रावण सरींचा ऊनपावसांचा खेळ चालू असतो....

कुठे पूर तर कुठे दुष्काळ पडलेला असतो...!!

हळूहळू एक एक दिवस संपूनी जातो...

अन् अमावास्येचा पोळासण उंबऱ्यआवर येऊन टेकतो..!!

राञंदिन काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाचा सखा सोबती...

नंदईश्वरांचा अंश असलेला वॄषभराज त्यांचा सोबती..!!

एक दिवस तेवढे बळीराजा आणि त्याच्या सख्यांचे पूजन....

कॄतार्थ भावनेने बळीराजा करतो बैलपोळा पूजन..!!

सामाजिक ऐक्य जपत गावोगावी येते बळीराजांच्या

उत्साहाला उधाण...!!

अनंत दुःख,अडचणींना विसरतो तो क्षणभरं...

बैलराजा सुखावतो अंतरी पोटभरं...!!

देतो तो बळीराजाला दुःख सोसण्यासाठी दहा हत्तींचे बळ..!!

बघता बघता चटकन् श्रावण मास संपून जातो... श्रीगणेशोत्सवाच्या ओढीची आस देऊनी जातो..!!

श्रावणसरींच्या बरसण्याने दूर होते मनांतील मर्गळ...

सण समारंभांच्या निमित्ताने मिळतेत गॄहीणींना बळ..!!

श्रावण सरी सरल्या जरी अवनीवरी....

श्रीगणेश व गौराईंची ओढ असते अंतरी...!!

श्रीजिवतीदेवी पूजनाचा,श्रीजेष्ठादेवींच्या कुलाचाराने..

होते श्रावणाची सांगता दरवर्षी घरोघरीं..!!

श्रावणसरी सुखावून जातात खोलवर अंतरी..!!



Rate this content
Log in