तमसो मा ज्योतिर्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
दिवा आणि वातीची मांगल्याची कहाणी..
एक अतूट प्रेमकहाणी..
दिव्याच्या तेजोमय वलयासाठी...
वातीचा जन्म होतो जळण्यासाठी!
अखंड स्वतःच राबते दिव्याला जपण्यासाठी...
दिव्यास प्रकाशित करत स्वत: स्वीकारते अंधकार!
वात आणि दिवा जोडीनं करतात संसार..
एकमेकांचा करीत सांभाळ..
दिव्यालाही दिसत तिचं जळणं..
वातीलाही हवं असतं त्याचं उजळणं...!!
रुसते,फुगते हर्षाने त्यांस सतत साथ देते..
वात एकदाची कालानुरूप जळून जाते..
दिव्याचं अस्तित्व संपुष्टात येते!
देतो विठोबा कुंभार पुन्हा मातीला आकार...
दिव्याचा होतो पुनर्जन्म होतो त्यांस साक्षात्कार..!!
चूकलो गं राणी अंतरी आर्त साद देतो वातीला..
तूजविणं उमगले गं तूझे अस्तित्व.!
p>
कायमच गॄहीत धरलेले होते मी तूला आयुष्यभरं...!
स्मितहास्य करीत ऐटीत मांगल्याचा साज चढवत..
सौभाग्याचे लेणे लेत वात चटकन येते दिव्याच्या साथीला...
सहज उच्चारते तिच्या पतीदेवांस...
सुख असो की दु:ख साथीने चालायाचे आयुष्यभरं!
अग्नि वंशाची मी सुकन्या आपण चिरंजीव कुळ पॄथ्वीतत्वाचे!
पंचभूते हीच आपली दैवते..
वायू आणि अग्निच्या आशिषाने होतो आपला संसार..
अवनी मध्येच विलिनीकरण आहे हेच संसाराचे सार...!
वायू आणि अग्निच्या साथीने मैञी निभवायची आयुष्यभरं मनापासून...
प्रत्येक क्षणाची सय जपायची अंतरी आशेचा किरण जपत...
एकमेकांशिवाय अस्तित्व नाही हे ध्यानात ठेवत..
प्रकाशमय करायचे सर्वांचे जीवन सर्वांना सांभाळत