STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

3  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

बाबा

बाबा

2 mins
223


नमस्कार मंडळी योगायोगाने काल मातृदिन आणि आज माझ्या परम प्रिय बाबांचा जन्मदिवस..मग कवितांची ही सुरेल मैफिल जमली..माझे बाबा म्हणजे अँडव्होकेट माझ्या बाबांसाठी ही कविता..

।।श्री।।

पितृदेवो भवः

ब ब 'बाबा' असतात मुलींचा जीव की प्राण...

मुलगी असते त्यांच्या काळजाचा ठोका...

पिता आणि कन्येचे नातेच असते जगावेगळे..

जन्म तिला द्यायचा आणि तिलाच 'कन्यादान' म्हणून द्यायचे!!

पहली बेटी 'धन की पेटी'..

पूर्वापार चालत आलेली 'म्हण' आहे.. 

ज्यांना याचा प्रत्यय येतो..

ते 'बाबा' भाग्यवान असतात....

'बाबा' म्हणजे आयुष्यातील कणखर गुरु..

आई मायेचा प्रेमळ झरा..

बाबा म्हणजे शिस्तबद्धतेचा 'कणखर कणा'..

बाबांचे रागवणे म्हणजे नारळासारखे...

कडक बोल जरी तरी मृदु नीर अश्रुंचे झरे...

बाबा सदैव कडकच वागत असतात...

अपत्यांच्या यशासाठी कायम झटत असतात..

आयुष्यभर काबाडकष्ट करत..

घराचे ओझे हसत हसत वाहतात..

कितीही दुःखी असले तरी..

शिताफीने स्वतः चे अश्रु लपवतात..

कधी नरम कधी गरम असा त्यांचा रुबाब असतो..

घरात नुसता त्यांच्या नावातच ..

'बाबा आले' या शब्दांत एक वचक असतो..!!!

शिस्तबद्ध बाबांचा सर्वांनाच धाक असतो..!

प्रसंगी स्वतःला सावरत सर्वांना हिंमत ते देत असतात...

हिंमत कधी हरायचीच नाही अशी शिकवण आर्वजून देतात..!!

अपत्यांच्या व्यक्तीत्वाचा सर्वांगिण विकास करत असतात..

'कुंभारापरी' बाबा मातीच्या गोळ्या ला..

हवातसा आकार देत असतात...!!

बाबा म्हणजे एक उत्तम 'शिल्पकार' असतात..!

दगडातून ही ते 'मूर्ती'.. घडवतात

आपले मूल आपल्या पेक्षा ही र्कतृत्ववान असावे..

हेच स्वप्न उरी बाळगत असतात..!

पिता म्हणजे एवढयाशा कुटुंबाचा भक्कम आधार..!

कुटुंबाच्या 'कल्पवृक्षाचे'..

खोलवर मातीत रुजलेले मूळ जणू..!!

स्वतः वणवण फिरत वृक्षाचे पोषण करतात...

'भक्कम मूळ ' कलपवृक्षाचे पोषण करते..

फळांची त्यास कधी अपेक्षाच नसते..!!

मातीत काबाडकष्ट करत ते..

जीवनाचे रान करत असतात..

'जगाचा पोषिंदा' मात्र फळांपासून वंचित असतात..!!

स्वअभ्यास करायला तेच शिकवत असतात...

स्वावलंबनाचे धडे ते कायमच गिरवायला देत असतात..

 रुचत नसतो त्यांना कुठलाच अवडंबर...

नको असतो त्यांना भरजरी पोषाख...

नाही लागत त्यांंना मिष्टान्न..

'र्कतव्यदक

्ष अपत्ये' यांचाच त्यांना ध्यास असतो..

'गुणवान संतती' हेच त्यांचे स्वप्न असते..

समाजात त्यांच्या र्कतुत्वास कळस चढवावा अपत्यांनी..

त्यांच्या नावाचा करावा लौकिक अपार..

हाच सामाजिक पोषाख आणि हेच त्यांचे त्यांच्यासाठी 'भरजरी वस्त्र' असते..

हेच त्यांच्या साठी मिष्टान्न असते!!

स्वतः ऊन्हात राहून ते 'सूर्यासम' आयुष्यभर प्रकाश देत असतात..!

कधी शितल 'चंद्राप्रमाणे' ..

वेडया मनाला आधार देतात..!!

 स्वतःच्या अपेक्षांचे ओझे

ते कधी लादत नसतात..

चांगला मित्र म्हणून सदैव साथ देत असतात..

आयुष्यातील डावपेच ते सहज शिकवतात..

बाबा म्हणजे एक 'रिंगमास्टर' असतात...!

अपत्यातील सर्वोत्तम गुणांना ते प्रकट करतात..

अपत्यांच्या सुयशाने ते अंतरी सुखावत असतात..

कन्येच्या लग्नाचे स्वप्न धूमधडाक्यात साजरे करतात..

र्कज काढून का होईना प्रत्येक बाबा मुलीच्या सुखासाठी वणवण हिंडत असतात...

सुपुत्र लाभला की बाबा खुष असतात..

'संसाराची बाजी' बाबा इथे जिंकतात..!!

हळूहळू बाबा वयाने थकत जातात...

औषधींचे सल्ले त्यांना नकोशे असतात..!!

नातवंडांसोबत 'बाबा'आता 'आजोबा' झालेले असतात..

दुधावरच्या सायीसाठी 'बब्बर शेर' असलेले बाबा ...

खेळण्यातला घोडा होत असतात..!!

" कामाच्या रहाडग्यात कधी तुमच्या मायबापांना खेळवू शकलो नाही रे.."

अशी आर्त हाक ते देत असतात..

'बाबा' आता 'आबा' होऊन लहान होत असतात..!

कडक असलेले बाबा एकदमच शांत होतात...

केलाच कुणी कधी दंगा..

तर घरात 'डरकाळी' ते फोडत असतात...

'बाबा आले' या शब्दातच ..

आपला दरारा कायम ठेवतात..!!

खरच बाबा म्हणजे घराचे 'छत्र' असते..

शिस्तीचे अंगणी 'काटेरी कुंपण' असते..

आखून देतात ते घरासमोर 'लक्ष्मण रेषा'..

त्यांचा शब्द म्हणजे ..

'काळया पाषाणावरील रेषा'..!!

बाबा म्हणजे शौर्याचा वारसा..

ठेच लागली की 'आईग् ' आपसूकच उच्चार..

भिती वाटली की 'बापरे'..

हा आश्वासक उच्चार..!!!

या पितृदेवतेस माझे शतशः वंदन.

सप्तर्षी,सप्तचिरंजीव..

मातृपितृभक्त श्री.गणराया..

कायम असावेत तूमचे आर्शिवाद सर्व पितृदेवतांवर..

समाजाच्या कुटुंबव्यवस्थेचा भार आहे त्यांच्या खांद्यांवर..!!!

स्त्रीशक्ती जगाते उद्धारी...

पुरुषोत्तम मुरारी भक्तांचा कैवारी...

कृपा असूदे सर्वांवरी..!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational