ISRO खूप छान वाटत...!
ISRO खूप छान वाटत...!
खूप छान वाटतं
जेंव्हा असं दृश्य दृष्टीस पडतं
तेंव्हाआपल्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं
चीज झाल्याचं दर्शन घडतं...
जेंव्हा देशभक्ती आणि देशशक्ती
म्हणजे काय हे कळतं
तेंव्हा देशाच्या स्वाभिमानाच चित्र
मोठ्या ऐटीत अभिमानाने अंतर्मनात डोलतं...
अगदी कोरीव नीटनेटकी प्रतिमा पाहून
कोठेतरी आपण असल्याचा भास होतो
या भारतभूमीत जन्मल्याचा आनंद बाबांनो
खरोखरच गगनात मावेनासा होतो...
हीच अंतरातली ऊर्जा
आपण साक्षीदार असल्याचा आनंद देते
जन्मोजन्मी पुरेल इतके सौख्य
गर्वाने आपल्या पदरात टाकते....
जयहिंद जयहिंद चा जयघोष
लीलया बेंबीच्या देठापासून उमटतो
आणि या यशस्वीतेच्या ऊर्जेने
पुन्हा जीवनाचा सूर सापडतो...
अभिनंदनाचा वर्षाव चौफेर होता
छाती अभिमानाने फुलून येते
जाता जाता ही शाबासकी त्यांची
सर्वांनाच नवचैतन्य देऊन जाते....
