वृक्ष वल्ली आम्हा सोयरी..
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी..
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी..
या मुलांनो सांगतो तुम्हाला, गोष्ट एक ज्ञानाची, झाडांमुळेच मीळते जीवन, रक्षा होते प्राणांची .
झाडाची आणि पावसाची आहे अनोखी मैत्री,
ती तुटल्यास मिळणार नाही जीवनाची खात्री
असंख्य पशु पक्षी वाढवतात निसर्गाचा मान सुजलाम सुफलाम भारत हाच आमचा प्राण
वृक्ष देतो मानवाला छाया
मग का करू नये त्यांच्यावर माया.
गाडी उन्हात लावतांना सावली कशी शोधतोस
एक झाड लावायला मागेपुढे का पाहतोस?
अरे मानवा...
तुमच्या प्रमाणे आम्हालाही भावना असतात
तुमच्या प्रमाणे आम्हालाही भावना असतात
वृक्षवेल बहरण्याचा आशा आम्हालाही वाटतात
म्हणून मी सांगतोय ध्यान देऊन ऐक....
जेंव्हा प्रत्येकाच्या दारात झाडाने सजेल अंगण,
तेंव्हा नक्कीच राहील पर्यावरणाचे संतुलन
जेव्हां होईल झाडांमधे वृध्दी,
तेव्हांच येईल जीवनात समृध्दी
वातावरण राहील प्रदूषण मुक्त
आणि जीवन होईल आरोग्ययुक्त
आपण सारे आपला धर्म निभाऊं,
झाडे वाचवुन आपले कर्तव्य बजाऊं
सारेजण मिळुन प्रत्येक अंगणात झाड लावु
