Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

♥️ प्रेमकथा ♥️

♥️ प्रेमकथा ♥️

1 min
282


सारखं वाटतं मनात 

तुझा चेहरा ठेवावा साठवून

जीवनाचा प्रत्येक क्षण जगावा 

फक्त तुलाच आठवून....♥️


आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात 

असावी फक्त तुझीच साथ

कधी सु:खात तर कधी दु:खात 

तू द्यावा हातात हात....♥️


सारखे आठवत राहतात 

तुला पाहिलेले आनंदि क्षण

तू कधी दिसशील पुन्हा 

आतुरतेने व्याकूळ होते मन....♥️ 


तू समोर आली की 

शब्दही निशब्द होतात

डोळे तुलाच पाहत राहतात 

आणि मनात साठवून घेतात....♥️


दोघेही आपण कायम अबोल 

सुरू आहे नुसता नजरेचा खेळ

तू जेव्हा समोर असतेस

तीच जीवनातील सुंदर वेळ....♥️


प्रेम म्हणावे कि आकर्षण 

अशी मनात आहे व्यथा

कुणाला काहीच माहित नाही 

अशी आहे आपली प्रेम कथा...

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance