आठवण मोबाईलची कि तिची...
आठवण मोबाईलची कि तिची...
ना बोलणं.. ना संदेश..
मोबाईल झाला खेळणा..
हळवं मन व्याकुळ झालं फार..
दिसभर उघडं झाप कर
व्हाट्सअपच दार..
नुसतं करुन खाल वर
बटणं बंद पडली..
स्क्रीन फुटली..
बोट तुटली..
पण काही नाही उपयोग
तरी सुरू माझा तोच उद्योग
अधून मधून चुकून वाजायच..
Msg आल्याच भासायचं..
पण मन निराश व्हायचं..
कारण लास्ट सिन चेक करुन तीन..
व्हाट्सअप च दार लावून घेतलेल असायच..
व्हाट्सअप च दार लावून घेतलेल असायच..
मी मात्र मोबाईलच्या अंगणात
गुंग Msg चा सडा शिंपण्यात
दिस बुडाला वाट पाहण्यात
आठवण मात्र होतं होती
पण मोबाईलची कि तिची...
हेच समजण्यात रात सारी सरली होती

