साथ मैत्रीची
साथ मैत्रीची
तू साथ दिल्यावर
मला मैत्रीच नातं कळलं
म्हणूनच तूझ्या सोबत मन माझं जुळलं..
तूझ्या मनाला माझ्या मैत्रीचा रस्ता छान कळू दे
मैत्रीच्या नात्याने मग दोघांचीही ओंझळ पूर्ण भरू दे..
मैत्रीची हि ज्योत अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या आपुलकीची भावना वाढू दे..
मैत्रीचा हा सहवास असाच निरंतर वाढवू या
मना मनातील विसंगती क्षणात दूर करू या..
जीवनात तूझी माझी मैत्री अशीच फुलू दे
केली गंमत चेष्टा तरी मैत्रीचा गोडवा कायम राहू दे..
एक मात्र खरं सांगतो.. एक मात्र खरं सांगतो..
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
पण जेव्हा समजेल तेव्हा नक्कीच वेड लावेल..
