भारतीय संविधान
भारतीय संविधान
साधण्या सामाजिक, आर्थिक न्याय
मिळाले आपणांस भारतीय संविधान
साऱ्यांनाच दिधला समानतेचा सन्मान
विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे गुणगान..|
शिक्षण, नोकरी साऱ्या क्षेत्रात संधी समान
माय भगिनींसाठी संविधान ठरले वरदान
न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुतेची जाण
वागण्या, बोलण्याचा धडा तो छान.. |
यशवंत,गुणवंत, कीर्तिवंत होण्या शिक्षण
जीवित, व्यक्तिगत स्वातंत्र्याबाबत संरक्षण
अपराधी गुन्हेगारास मात्र कडक शासन
करू सारे या तेजपुंज विचारांचे जागरण..|
जातीभेद विसरुनी करू संस्कृतीचे जतन
हिच देते संविधान आपणांस शिकवण
करू शाहू, फुले, आंबेडकर यांना नमन
एकता, अखंडता जपू आपण सर्वजण.. |
बावीस भाग, तीनशे पंच्यान्नव अनुच्छेदातून
26 नोव्हेंबर 1949 ला लिहिले सुवर्णपान
लेखणीत बंदिस्त केले भीमराव ते महान
सर्वश्रेष्ठ उपाधी दिधली तयांस भारतरत्न.. |
