प्रेम कळलेच नाही
प्रेम कळलेच नाही
प्रेम म्हणजे काय असतं..
तुला अन मला कळलच नाही
नात्यातल्या नात्यात गुंतताना
कधी एकमेकांचे झालो कळलंच नाही…
जीव होतो वेडा पिसा
जेव्हा येते तूझी आठवण
हृदयात केलेली असते तूझ्या
छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…
मनाला तूझ्या शिवाय
काही दुसर सुचत नाही
अन तूझ्या शिवाय दुसरा कुठला
विचार करावा असं आता वाटत नाही…
रात्र अन रात्र छान च असते
तूझ्या स्वप्नानी भरलेली
यौवनातील प्रेमाच्या स्पर्शाने
सारी रात्र बहरलेली...
प्रेम आपलं असूनहि एक होणं
हेच जीवनाच साध्य नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी
कोपर्यात प्रेम नेहमीच जपायच असत…
आपल्या नात्यातील प्रेमाच हे कोड
कधी च कुणाला कळणार नाही
आपणच आपल्यात कसे गुंतलो ते
आपणालाही उमगणार नाही...
कितीही आड आली नाती तरीही
मी प्रेम करायच कधी थांबणार नाही..

