STORYMIRROR

Madhuri Dashpute

Romance

3  

Madhuri Dashpute

Romance

समुद्रकिनारा

समुद्रकिनारा

1 min
393

मिलनाच्या आशे ती मिळे, त्या विशाल दर्याला

फिरुनी न पाही वाहता, त्या स्तब्ध किनाऱ्याला!


अतृप्त तो कसा, उद्विग्न आज झाला

सय येता त्या सरितेची, तो वेडापिसा झाला!


कित्तेकांनी त्याच्या, जखमा त्या चिरडील्या

पायी तुडवीत त्याला, पुरता मुरडीला!


वेदना त्याच्याच, तोच एकला जाणी

जो पाही लाथाडूनी, क्षुद्र त्यास मानी!


दिली साथ ज्याने, कित्येक रम्य वेळी

त्त्यागूनी त्यासी सरिता, सागरात लीन झाली!


देऊनी यातना त्यास, सांगा ती तृप्त कशी राहील?

वाहवणारी सतत ती, आता शांतच राहील!


येईल मग तिला ही, सय कधी त्याची

होऊनि तप्त वाफा, भिडेल थेट गगनाशी!


सरिंच्या संगे येईल धावत, पूर्व तिच्या पदाशी

खेटेल मग उगाच लडिवाळ, त्याच्याच अंगाशी!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance